सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आ. मंगेश चव्हाण यांची निवड

mangesh Chavhan11

चाळीसगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्याचा सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आमदार मंगेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. खऱ्या अर्थाने ही समस्त चाळीसगाव वासीयांच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

१६ ते १९ फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यापुर्वी माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जैन उद्योग समूहाचे अशोक जैन यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी हे अध्यक्षपद भूषविले आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमांची दैनंदिनी याप्रमाणे
१६ फेब्रुवारी २०२० – सायं. ४ वाजता काव्यरत्नावली चौक येथून मोटार सायकल रॅली, १७ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ४ वाजता काव्यरत्नावली चौक, येथून जिजाऊ ब्रिगेडतर्फे मोटार सायकल रॅली, १८ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता आकाशवाणी चौक येथे वृक्षारोपण आणि १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी जिल्हावासीयांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Protected Content