चिंचखेडा येथे शेतीच्या वादातून जमावाने तिघांना बदडले; एक गंभीर

chinkhedaaaa

जळगाव प्रतिनिधी । शेताच्या वादातून १५ जणांच्या जमावाने वयोवृध्दासह इतर दोन जणांना बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना आज जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे घडली. तिघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, आनंदा रामचंद्र बोरसे (वय-६३) रा. चिंचखेडा ता. जामनेर यांचे शेत एका व्यक्तीला काही दिवस गहाण म्हणून कसायला दिले होते. त्यानंतर त्यांनी सर्व प्रक्रिया पुर्ण करून गेल्यावर्षी शेताचा ताबा घेतला. यानंतर यावर्षी शेत तयार करून दोन दिवसांपुर्वी शेतात हरभरा पेरला आणि आज पाणी भरणयासाठी शेतात गेले. सकाळी १० ते ११ वाजेच्या सुमारास गावातील १० ते १५ जणांना लाठ्याकाठ्या, लोखंडी सळई, लाकूड घेवून आनंदा बोरसे यांना बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण करत असल्याचे पाहून मुलगी अलकाबाई सुनिल पाटील आणि नातू विजय सुनिल पाटील (वय-२२) दोन्ही रा. चिंचखेडा ता. जामनेर हे आवराआवर करण्यासाठी धावून आले. त्यात त्यांनादेखील बेदम मारहाण केली. यात विजय पाटील याच्या पोटाला मुकामार बसला आहे. तिघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप पोलीसांत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content