क्राईम, राज्य

धक्कादायक : बोर्डिंग स्कूलमध्ये ११ अल्पवयीन आदिवासी विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार

शेअर करा !
rape on boy
 

पुणे (वृत्तसंस्था) पंचगनी येथील एका बोर्डिंग स्कूलमध्ये ११ अल्पवयीन आदिवासी विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • spot sanction insta
  • advt tsh flats

या बोर्डिंग स्कूलमधील 11 मुले शाळेची भिंत ओलांडून पळून जात असताना स्थानिक लोकांनी त्यांना अडवले आणि याबाबत कारण विचारले. यानंतर मुलांनी शाळेत घडत असलेला सर्व किळसवाना प्रकार सांगितला. लोकांनी फोनवरून मुलांच्या कुटुंबीयांना संबंधित माहिती दिली. यावेळी मुलांनी सांगितले की, शाळेतील शिक्षक आणि शाळा प्रशासन त्यांना त्रास देत असून त्यांचे लैंगिक शोषण करत होते. काही विद्यार्थ्यानी सांगितले की, एक माणूस रात्री त्यांच्या पांघरुणात घुसतो आणि अश्लिल चाळे करतो. काही मुले म्हणाले की, त्यांनी जेवण दिले जात नव्हते. तर कधी उष्टे जेवण दिले जात होते. त्यानंतर संतप्त पालकांनी पोलिसांत गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.