अर्थ, आरोग्य, यावल

यावल येथे गॅस सिलेंडर वाढीचा निषेध; राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन

शेअर करा !

यावल प्रतिनिधी । केंद्र शासनाने घरगुती गॅस सिलेंडरचे दरवाढ केल्याने यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांनी देण्यात आले.

  • spot sanction insta
  • advt tsh flats

आजपासुन लागु करण्यात आलेल्या गॅसच्या किमतीत १४५ रुपयांनी किमती वाढुन जाता एका गॅस सिलेंडर मागे ८२९, रुपये ५० पैसे प्रमाणे सर्वसामान्य नागरीकांना मोजावे लागणार आहे .केन्द्रात पंत प्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासुन गॅस सिलेंडरच्या राज्याप्रमाणे वाढलेल्या किमती पुढीलप्रमाणे महाराष्ट्र १४९, ५०, दिल्लीतील गॅस सिलेंडरच्या वाढलेली किमत१४९ रूपये , कोलकातामध्ये १४९ रुपये प्रमाणे चेन्नईमध्ये १४७ रुपये अशा प्रकारे भरमसाठ किमती वाढवुन हे मोदी सरकार देशातील नागरीकांची लुट करीत असल्याचे दिसुन येत असल्याचे सांगुन , नरेन्द्र मोदीचे केन्द्रात सरकार आल्यापासुन वाढलेल्या किमती २०१४ मध्ये, २०१५ मध्ये ६६२ रुपये, २०१६ मध्ये ५४८ रूपये , २०१७मध्ये ७६३ रुपये , २०१८मध्ये ६६३ रूपये , २०१९मध्ये ७१६ रुपये , आणी २०२०मध्ये ८६८ , रुपये ५० पैसेप्रमाणे भरमसाठ अशा गॅस सिलेंडरच्या किमती वाढवलेल्या असुन , एकंदरीत या वाढवलेल्या गॅसच्या किमतीमुळे देशातील सर्वसामान्य नागरीक मध्यवर्गीयांची आर्थिक लुट होत असुन , या वाढलेल्या गॅस सिलेंडरच्या किमतीच्या निषेर्धात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महीला जिल्हा ( ग्रामीण ) च्या जिल्हा अध्यक्ष कल्पना शांताराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिनाल पाटील ( जिल्हा कार्यध्यक्ष ), जयश्री पाटील (जिल्हा सरचिटणीस), अर्चना कदम , शोभा भोईटे, कमल पाटील, आशा अंबोरे, आशा चावरीया,सकीना तडवी , पिनास फनीबंदा , राष्ट्रवादीच्या यावल तालुका महीला कॉंग्रेसच्या व्दारका पाटील, उपाध्यक्ष उषा निळे, मिनाक्षी चव्हाण ( जिल्हा उपाध्यक्ष ) , रा .कॉ .महीला उपाध्यक्ष सुरेखा पारधे आदी महीला कार्यकर्त्या मोठया संख्येने या प्रसंगी शिष्टमंडळात सहभाग घेतला, यावेळी यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी त्यांचे निवेदन स्विकारले.