राजकीय, राष्ट्रीय

गॅस दरवाढीवरून राहूल गांधी यांचा स्मृती इराणींना टोला

शेअर करा !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । गॅस दरवाढीवरून राहूल गांधी यांनी केंद्रीय मंत्री यांना त्यांच्या जुन्या आंदोलनाचा फोटो ट्विट करून टोला मारला आहे.

  • advt tsh flats
  • spot sanction insta

याबाबत वृत्त असे की, दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवानंतर विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्रातील सत्ताधारी भाजपावर काँग्रेसने टीका सुरु केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत भाजपावर निशाणा साधला आहे. गांधी यांनी स्मृती इराणी यांचा जुना फोटो ट्विट केला आहे. यामध्ये स्मृती इराणी आणि भाजपाचे कार्यकर्ते गॅस सिलिंडर घेऊन आंदोलन करताना दिसत आहेत. या फोटोसह राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, एलपीजी सिलिंडरच्या दरात १५० रुपयांची वाढ केल्याच्या विरोधात आंदोलन करणार्‍या भाजपाच्या या सदस्यांसोबत मी सहमत आहे.

ज्यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएचे सरकार होते, तेंव्हाचा हा स्मृती इराणी यांचा फोटो आहे. यूपीए सरकारच्या कार्यकाळात गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. त्यावेळी भाजपाने जोरदार आंदोलन केले होते. स्मृती इराणी गॅस सिलिंडर घेऊन भाजपा कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरल्या होत्या. यावरूनच राहूल गांधी यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.