पहूर येथे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

pahur news

पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी । पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर टी. लेले. हायस्कूल तसेच कनिष्ठ महाविद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  माजी. जि.प. सदस्य तथा संस्थेचे संचालक राजधर पांढरे हे होते. प्रमुख मार्गदर्शक नेरी येथील जनता स्कूलचे प्राचार्य पाटिल हे होते.

 

प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे व्हाईस चेअरमन साहेबराव देशमुख, धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश पांढरे, शाळेचे मुख्याध्यापक सी.टी. पाटील, विलास भालेराव, शाळेचे पर्यवेक्षक आर.बी. पाटील, वरिष्ठ लिपिक किशोर पाटील, शाळेचे शिक्षक एस.व्ही. पाटील, विजय बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती देवीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शक नेरी येथील जनता स्कूलचे प्राचार्य पाटील, आर. बी. पाटील, मुख्याध्यापक सी.टी. पाटील, रामेश्वर पाटील, एस.व्ही. पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष भाषणातून राजधर पांढरे यांनी सांगितले की, आपल्या शाळेतील शिक्षकांनी खूप चांगले काम केले आहे. तुम्ही आतापासून परीक्षेच्या तयारीला लागावे, यश निश्चित मिळेल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन देशमुख यांनी केले तर आभार जी. एच. भामरे, यांनी मानले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content