Home क्राईम मुंबईतील बारमालकाचा कर्नाटकच्या जंगलात खून ; चार जणांना अटक

मुंबईतील बारमालकाचा कर्नाटकच्या जंगलात खून ; चार जणांना अटक


muder 3
 

मुंबई (वृत्तसंस्था) नवी मुंबईतील एका बारमालकाची कर्नाटकच्या जंगलात निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्र फिरवीत चार जणांना अटक केली आहे.

उडपीमध्ये बेलनहल्लीजवळच्या कुक्के गावातील जंगलामध्ये १० फेब्रुवारीला सीबीडी येथील बारमालक वशिष्ठ यादव यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी सुमित मिश्रा (२३), अब्दुल शुकूर (३५), अविनाश कारकेरा (२५) आणि मोहम्मद शरीफ (३२) यांना अटक केली आहे. आरोपींमधील सुमित हा माया बारमध्ये आधी काम करत होता. तर इतर तिघे जण एका ट्रॅव्हल कंपनीत कामाला होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित आणि वशिष्ठ यांच्यात तीन महिन्यांपूर्वी पैशांवरुन भांडण झाले होते. म्हणून त्याने नोकरी सोडली होती. पण नंतर मित्रांच्या मदतीने सुमितने वशिष्ठ यांना उडपी येथे आणले आणि वायरीने गळा आवळून खून केला.


Protected Content

Play sound