ऑस्कर पुरस्कारांवर पॅरासाईटची मोहर

parasite movie

लॉस एंजल्स । मनोरंजन विश्‍वाची नजर लागून असणार्‍या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत पॅरासाईट या दक्षिण कोरियन चित्रपटाने चार पुरस्कार मिळवून यंदाच्या सोहळ्यावर आपली अमीट छाप सोडली आहे.

पॅरासाईटफ सिनेमा चर्चेत होता मात्र जेव्हा या सिनेमाला नामंकन मिळाला तेव्हा हा सिनेमा ऑस्कर जिंकेल असे कुणालाच वाटले नव्हते. मपॅरासाईटफला कडवी स्पर्धा होती ती १९१७ या सिनेमाशी. सुरुवातीला परासाईट सिनेमा काहीसा मागे होता मात्र ऑस्कर जसा जवळ आला तसा हा सिनेमा इतिहास रचणार यांचे संकेत मिळाले. आणि झालेही तसेच ! पॅरासाईट सिनेमाने तब्बल ४ विभागात पारितोषीक पटकावले. यात ओरिजनल स्क्रिनप्ले, बेस्ट फिल्म, बेस्ट डायरेक्टर आणि बेस्ट इंटरनॅशनल फिचर कॅटगरीमध्ये परासाईटला ऑस्कर मिळाले. एकाच सिनेमासला बेस्ट इंटरनॅशनल फिल्म आणि बेस्ट असे दोन्ही अ‍ॅवॉर्ड्स एकत्र मिळाले. ऑस्करच्या इतिहासात ही बाब पहिल्यांदाच घडली आहे हे विशेष. पॅरासाईट सिनेमात गरीबी आणि श्रीमंत यांच्यातील दरी अत्यंत सुंदरपणे रेखाटली आहे. परासाईट पहिला आशियायी सिनेमा ज्याला ऑस्करने सन्मानित करण्यात आले आहे.

Protected Content