असा नराधम आपल्या घरात होऊ देऊ नका, तीच खरी श्रध्दांजली – अजित पवार

ajit pawar

मुंबई वृत्तसंस्था । हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीच्या मृत्यूनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या घटनेचा संपात व्यक्त केला आहे. आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल पण, आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्यातील मृत बहिणीला आपली आदरांजली असेल, असे अजित पवार म्हणाले. हिंगणघाटमध्ये जळीतकांडात जखमी झालेल्या तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आज सकाळी पीडित तरुणीचा मृत्यू झाला.

वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील 24 वर्षीय पीडित शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने पहाटे तरुणीची प्रकृती खालावली होती, त्यानंतर आज सकाळी (१० फेब्रुवारी) ६.५५ मिनिटांनी तिने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पीडितेला औषधं देऊन हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. काल संपूर्ण रात्रभर तिला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. संसर्गामुळे तिच्या रक्तपेशी, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे मेंदू, फुफ्फुसांवरही परिणाम झाला होता, असं डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

Protected Content