


भुसावळ, प्रतिनिधी | येथील जेसीआय भुसावळ ताप्तीचा पदग्रहण सोहळा शहरातील राधाकृष्ण हॉटेल मध्ये नुकताच पार पडला. या सोहळ्यात नवीन अध्यक्षपदी दिपा पटेल यांची निवड करण्यात आली.
जेसीआय भुसावळ ताप्तीच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल पास प्रेसिडेंट रश्मी शर्मा, झेडव्हिपी चेतन पाटील, झेडजीपी संगीता अग्रवाल, पी झेडपी गोपाल पटवारी, योगीता झवर, डॉ. हर्षिता अग्रवाल हे होते. मावळते अध्यक्ष योगीता झवर यांनी नुविन अध्यक्ष दिपा पटेल यांना पदभार सोपविला तर मावळत्या सेक्रेटरी डॉ. हर्षीता अग्रवाल यांनी नुतन सेक्रेटरी करिना छाबडा यांना पदभार सोपविला. यावेळी पुर्व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निलेश झवर, डॉ. मोनिका अग्रवाल, संजय यावलकर, राजेश झवर, रजनी सावकारे, निकीता आहूजा, डिम्पल छाबडा, जयश्री अग्रवाल, रेखा गोस्वामी, शशी स्वामी, स्वाती देव, मोहीनी देव, दिपा आहूजा, रीया छाबडा, प्रिया छाबडा, सोनल झवर उपस्थित होते. गोपाल पटवारी व चेतन पाटील, रश्मी शर्मा यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन श्रृती लाहोटी यांनी तर आभार नुतन सेक्रेटरी करीना छाबडा यांनी मानले.


