Home क्राईम चोपडा येथे लाचखोर नायब तहसीलदारास अटक

चोपडा येथे लाचखोर नायब तहसीलदारास अटक

0
100
jail11 2017071030


jail11 2017071030

चोपडा प्रतिनिधी । मृत्यूप्रमाणपत्रापणे शेतीचा निकाल देण्यासाठी 15 हजारांची लाच मागणार्‍या चोपडा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारास एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांनी मृत्यू प्रमाणपत्रा संदर्भात शेतीचा निकाल देण्यासाठी येथील नायब तहसीलदार जितेंद्र मच्छिंद्रनाथ पंजे यांनी तक्रारदाराकडे १५ हजाराची मागणी केली होती. यादरम्यान याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभाग जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यांनी एसीबीचे पोलीस अधिकक्ष गोपाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुपारी चोपडा तहसील कार्यालयात सापळा रचून १५ हजार रूपयांची लाच स्विकारतांना संशयित आरोपी नायब तहसीलदार जितेंद्र पंजे यांना रंगेहात पकडून अटक केली आहे. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound