Home क्राईम धामणगाव फाट्याजवळ रिक्षाचा अपघात; दोघे जखमी

धामणगाव फाट्याजवळ रिक्षाचा अपघात; दोघे जखमी


Accident

जळगाव प्रतिनिधी । जळगावहून विदगावकडे जाणाऱ्या रिक्षाला अज्ञात ओम्नी वाहनाने दिलेल्या धडकेत रिक्षातील दोन जण जखमी झाल्याची घटना दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. दोघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, राजेंद्र अंकुश कोळी आणि संदीप भागवत कोळी (वय-36) दोन्ही रा. विदगाव हे दोघे रिक्षाने जळगावहून विदगाव येथे येत असतांना दुपारी ४ वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या ओमनी वाहनाने जोरदार धडक दिली. यात रिक्षातील दोघेजण गंभीर जखमी झाले दोघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.


Protected Content

Play sound