जळगाव, प्रतिनिधी | येथील ह.भ.प. संत तोताराम महाराज लेवा पाटीदार समाज नवचैतन्य मंडळ जळगावतर्फे उद्या रविवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. संतबाबा हरदासराम मंगल कार्यालय, सिंधी कॉलनी येथे परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
शेतकरी, व्यावसायिक व नोकरदारांसाठी युवक युवतींसाठी आयोजित या परिचय मेळाव्यास पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. सुरेश भोळे, भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, भुसावळ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, राजेंद्र राणे, कुंदन ढाके उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी सुची प्रकाशन, विशेष प्राविण्य सन्मान केला जाणार आहे.