Home Cities चाळीसगाव प्रणाली जाधव हत्याप्रकरणी सीआयडी चौकशी करण्याची मागणी

प्रणाली जाधव हत्याप्रकरणी सीआयडी चौकशी करण्याची मागणी


चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील शिंपी समाजाने आज (दि.१४) तहसील कार्यालयावर एका मोर्चाद्वारे निवेदन सादर केले असून या निवेदनात उंडणगाव तालुका सिल्लोड येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी प्रणाली कृष्णा जाधव हिने लिपिक संजय घोगरे याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप केला आहे.


यासंबंधी अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणात निष्पाप प्रणाली हिला आपला प्राण गमवावा लागला असल्याने तिच्या मृत्यूच्या कारणीभूत असलेल्या संजय घोगरे या आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी व सदर घटनेचा तपास सीआयडीमार्फत करण्यात यावा, या खटल्यात वरिष्ठ सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांची नेमणूक व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या दामिनी पथकाची काम गतिमान करण्यात यावे, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी शिंपी समाजातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound