Home धर्म-समाज पारोळा येथे अमर शहीद हेमु कालानी यांना श्रध्दांजली

पारोळा येथे अमर शहीद हेमु कालानी यांना श्रध्दांजली


parola hemu

पारोळा प्रतिनिधी । पारोळा येथे अमर शहीद हेमु कालानी यांना भारतीय सिंधु सभा व पारोळा सिंधी पंचायततर्फे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. प्रथम सकाळी शहीद हेमु कालानी यांच्या प्रतिमेला हार घालून व दोन मिनिटे मौन धारण करण्यात आली. त्यानंतर शहीद हेमु कालानी यांच्या जीवन चरित्र्यावर भारतीय सिंधु सभेचे पारोळा येथील अध्यक्ष अशोक कुमार लालवानी यांनी प्रकाश टाकला.

याप्रसंगी पारोळा शहराचे सिंधी समाजाचे वरिष्ठ किशनचंद हिंदुजा, नारायणदास लालवानी, लालचंद नदंवाणी, समाजाचे मुखी सुरेश हिंदुजा, समाज अध्यक्ष व भारतीय सिंधु सभा पारोळा शाखेचे अध्यक्ष, अशोक कुमार लालवानी समाज उपाध्यक्ष, शंकर हिंदुजा, बालचंद नंदवाणी, महेश हिंदुजा, सुनिल वालेचा, राजकुमार नागदेव, प्रेमचंद मेलवाणी, गिरधर लुल्ला, कमल लालवानी, किशोर नंदवाणी,खेमचंद हिंदुजा, भारतीय जनता पार्टी चे व्यापारी आघाडी चे तालुका अध्यक्ष विनोद हिंदुजा, मुकेश नंदवाणी, धर्मेंद्र हिंदुजा, विक्रम लालवानी, याच्या सह शहरातील सर्व समाज बाधंव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.


Protected Content

Play sound