व्हिडिओचा पूर्ण आनंद घेता आला नाही; पॉर्न साइटविरुद्ध खटला

pornhub

 

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) सबटायटलशिवाय जे कर्णबधिर आहेत, तसेच ज्यांना कमी ऐकायला येते अशा लोकांना व्हिडिओचा पूर्ण आनंद मिळत नाही, म्हणून एका कर्णबधिर व्यक्तीने तीन पॉर्न वेबसाइट्सविरुद्ध खटला दाखल केला आहे. एवढेच नव्हे तर, तक्रारी अर्जात नुकसानभरपाई देण्याचीही मागणी केली आहे.

 

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात राहणाऱ्या यारोस्लाव सुरीज या कर्णबधिर व्यक्तीने पॉर्नहब, रेडट्यूब आणि यूपॉर्न आणि या बेवसाइटची कॅनडातील मुख्य कंपनी माइंडगीकविरुद्ध ब्रुकलीन फेडरल कोर्टात खटला दाखल केला आहे. या वेबसाइट ‘अमेरिकंस विद डिसेबॅलिटी अॅक्ट’ (दिव्यांगांसदर्भातील कायदा) या कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे सुरीजने म्हटले आहे. या वेबसाइट्सविरुद्ध तक्रार करताना सुरीज यांनी २३ पानांचा अर्ज लिहिला आहे. सबटायटलशिवाय जे कर्णबधिर आहेत, तसेच ज्यांना कमी ऐकायला येते अशा लोकांना व्हिडिओचा पूर्ण आनंद मिळत नाही, असे सुरीज यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, सुरीज यांनी अर्जात नुकसानभरपाई देण्याचीही मागणी केली आहे. सर्व वेबसाइट्सनी सबटाटल देत जावे असे आपल्याला वाटत असल्याचे सुरीज यांनी म्हटले आहे.

Protected Content