Home धर्म-समाज नभिक समाज मंडळातर्फे मोफत ‘केसकर्तन’

नभिक समाज मंडळातर्फे मोफत ‘केसकर्तन’

0
47

nabhik samaj

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील धाबे या गावात केशकर्तनालय नसल्यामुळे नभिक समाज मंडळातर्फे धाबे जि.प. शाळेतील आदिवासी व गरीब विदयार्थ्यांचे मोफत केस कर्तन आज (दि.17) करण्यात आले आहे. यावेळी शाळेतील ३० विदयार्थ्यांनी केशकर्तनाचा लाभ घेतला असून मंडळाने मोफत केशकर्तन करुन समाजासमोर अनोखा आदर्श ठेवला आहे.

पारोळा येथील पत्रकार अभय पाटील व पत्रकार मनोहर केदार लोणी यांच्या सहकार्याने सोशल मेडियाच्या माध्यमातून याबाबत आवाहन करण्यात आले होते. अभय पाटील हे आपल्या सोशल मिडीया ग्रुपच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन करत असून त्याला अनेक समाजप्रेमी बांधवकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असतो. ग्रामिण भागातील गरिब मुलांना स्वेटर व शैक्षणिक साहित्य वाटप, पाऊस ग्रस्त लोकांना आर्थिक मदत, धान्य कपडे, संसारोपयोगी वस्तु, शाल वाटप यांसह आदिवासी विदयार्थ्यांची शाळेत केश कर्तन पथक नेऊन कटिंग करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवित आहेत.

याचाच एक भाग म्हणून पत्रकार अभय पाटील, बापूसाहेब नावरकर, डॉ.रविंद्र निकम, मनोहर केदार यांच्यासह केशकर्तनकार संजय सैंदाणे, अध्यक्ष सेनाजी बहुउद्देशिय संस्था लोणी बु. रविंद्र वारुळे नगाव, योगेश वारूळे, नगाव, किशोर पवार पळासखेडे, कैलास सोनवणे मोरफळ यांच्या पथकाने एकूण 20 विदयार्थ्यांची सुंदर कटिंग करून त्यांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. तसेच संजय सैंदाणे यांनी शाळेतील ५३ विद्यार्थीनींना खाऊ वाटप करण्यात आले.

धाबे या गावात केशकर्तनालय नसल्यामुळे विदयार्थी पालक बाजाराच्या दिवशी त्यांना केश कापण्यासाठी शहरात आणतात. कधी-कधी पैसे नसल्यामुळे उशिर होतो. सध्या बऱ्याच विदयार्थ्यांचे पालक बाहेर राज्यात ऊस तोडणीच्या कामावर गेले आहेत. त्यामुळे शाळेतच जागेवर त्यांना काटिंग करून मिळाल्याने मुलांमध्ये वेगळाच आनंद दिसून आला आहे. विद्यार्थी स्वच्छ व सुंदर दिसु लागले. ही छान सेवा दिल्याबद्दल वरील सर्व मान्यवरांचे शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरिष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी स्वागत करून आभार मानले. तसेच यापुढे नियमित शाळेवरच विदयार्थ्यांना ही सेवा देण्याचे अश्वासन डॉ.रविंद्र निकम यांनी दिले आहे.


Protected Content

Play sound