पाचोरा येथे कॉग्रेसने केला भाजपाच्या पुस्तकाचा निषेध

WhatsApp Image 2020 01 14 at 8.44.27 PM

पाचोरा, प्रतिनिधी | नवी दील्लीच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपा नेते लिखित छत्रपतींचा अपमान करणार्‍या पुस्तकाचा निषेध कॉग्रेसतर्फे करण्यात आला.

पाचोरा कॉग्रेसच्या वतीने येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले की, भाजपा नेते जयभगवान गोयल यांनी ‘आज के शिवाजी मोदी’ हे पुस्तक लिहिले असुन ते प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकाचा निषेध करण्यात येऊन तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी नायबतहसिलदार भोईटे यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अॅड. अविनाश भालेराव, राहुल गांधी युथ ब्रिगेड महाराष्ट्र अध्यक्ष सचिन सोमवंशी, माजी अध्यक्ष शेख इस्माईल शेख फकीरा, प्रा. एस. डी पाटील, नंदकुमार सोनार, साहेबराव पाटील, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, सरचिटणीस प्रताप पाटील, अनिल पाटील, किरण पाटील, जिल्हा सरचिटणीस संगिता नेवे, महिला तालुका अध्यक्ष कुसुमताई पाटील, अविनाश पवार, रविंद्र नेवे, शिवराम पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पुस्तकाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

Protected Content