Home Cities चोपडा चोपडा महावीर पतसंस्थेची जिल्हा उपनिबंधकाकडून प्रशासकीय चौकशीचे आदेश

चोपडा महावीर पतसंस्थेची जिल्हा उपनिबंधकाकडून प्रशासकीय चौकशीचे आदेश


 

चोपडा ( प्रतिनिधी) येथील नावाजलेली महावीर पतसंस्थेच्या बाबतीत काही तक्रारदारांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. त्यावर जिल्हा उपनिबंधकाकडून प्रशासकीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

 

जिल्हा उपनिबंधकांच्या दालनात तक्रारदार व संस्थेचे व्यवस्थापक यांची दि १९ डिसेंबर २०१९ रोजी समोरासमोर सुनावणी झाली होती. परंतु तक्रारदारांना त्या सुनावणीत समाधानकारक उत्तर न मिळाली नाहीत. त्यामुळे त्याचवेळी त्या ठिकाणी तक्रारदारांनी परत तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे दिल्याने जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड यांनी तात्काळ सहकार कायदा कलम 89 (अ ) प्रमाणे प्रशासकीय चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार जी. एच. पाटील यांच्यासह पथकांची चौकशी तात्काळ नियुक्ती देखील केली आहे. या चौकशीमुळे शहरात तर्कवितर्क सुरू असून ठेवीदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. तर शहरातील नागरिकांची चौकशीकडे लक्ष लागून आहे.


Protected Content

Play sound