जळगाव, प्रतिनिधी | परवा दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात फीवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर एबीव्हीपीच्या गुंडांकरवी हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षातर्फे करण्यात आला. महानगर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने गृहमंत्री अमित शहा पुतळा जाळून याचा निषेध करण्यात आला.
जेएनयूत महिला वसतिगृहात ह्या गुंडांनी अमानुषपणे या विद्यार्थ्यांना व तेथील विद्यार्थी प्रमुख आयुषी घोष हिला देखील जबर मारहाण करण्यात आली. यात संतापजनक घटना म्हणजे विद्यापीठात हे गुंड मारहाणीचं थैमान घालत असताना दिल्ली पोलीस मात्र कंपाउंडच्या बाहेर शांत उभी होती. याउलट आतमध्ये जाऊन या विद्यार्थ्यांना बाहेर निघण्यास मदत व्हावी म्हणून धडपड करणाऱ्या अन्य लोकांनाही पोलीस आत जाऊ देत नव्हते. यावरून हे स्पष्ट होतं की हा हल्ला सरकारपुरस्कृत होता असा आरोप करण्यात आला आहे. केंद्र सरकार जे विद्यार्थी आपल्याला विरोध करत आहेत त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र ज्यावेळी विद्यार्थी एखाद्या सरकार विरोधात उतरत असतात तेव्हा हे सरकार जास्त काळ सत्तेवर राहू शकत नाही. म्हणून असा हल्ला करण्यात येतो. मात्र देशभर यानंतर जेएनयु समर्थनार्थ हजारो मोर्चे निघत आहेत. याच धर्तीवर आज जळगाव शहरात महानगर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा व गृहमंत्री अमित शाहचा प्रतिकात्मकरित्या पुतळा जाळून निषेध करण्यात आला. व या फॅसिस्ट सरकारच्या भ्याड हल्ल्याचा विरोध करण्यात आला. यावेळी माझ्यासोबत जिल्ह्याचे अध्यक्ष मा. रवींद्रभैय्या पाटील, तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अनेक जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते बांधव उपस्थित होते.