Home Cities अमळनेर अमळनेर पंचायत समितीवर भाजपचा झेंडा

अमळनेर पंचायत समितीवर भाजपचा झेंडा

0
34

अमळनेर प्रतिनिधी । येथील पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती या दोन्ही पदांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया आज घेण्यात आली. या दोन्ही पदांसाठी अनुक्रमे भाजपाच्या सौ. रेखा नाटेश्‍वर पाटील तर उपसभापतीपदी भिकेश पावभा पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली असून याबाबत दुपारी तीन वाजता औपचारीक घोषणा होणार आहे. तालुक्यातील बदलत्या राजकीय स्थितीतही भाजपने पंचायत समितीवर आपली पकड कायम ठेवल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.


Protected Content

Play sound