नव वर्षाच्या पहिल्या दिवशी भारतात सर्वाधिक बालकांचा जन्म

new baby

नवी दिल्ली वृत्तसंस्था । १ जानेवारी २०२० रोजी भारतात नव वर्षाचे स्वागत होत असताना तब्बल ६७,३८५ बालकांनी जन्म घेतला आहे. लोकसंख्येत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताने ‘अव्वल’ चीनला मागे टाकत जगात पहिला क्रमांक पटकावला.

१ जानेवारी २०२० जन्म घेतलेल्या बालकांची संख्या जगभरात सर्वाधिक आहे. लोकसंख्येत अव्वल स्थानी असलेल्या चीन मात्र दुसऱ्या स्थानी आहे. १ जानेवारी या दिवशी चीनमध्ये ४६,२२९ बालकांनी जन्म घेतला, तर नायजेरियात २६,०३९ बालकांनी, पाकिस्तानात १३,०२० बालकांनी, तर इंडोनेशियात १३,०२० बालकांनी जन्म घेतला. अमेरिकेत या दिवशी १०,४५२ बालकांनी जन्म घेतला. युनीसेफने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. संपूर्ण जगात १ जानेवारी २०२० साली जन्म घेतलेल्या बालकांची संख्या विचारात घेतल्यास भारतात जन्माला आलेल्या बालकांची संख्या १७ टक्के इतकी आहे. जगातील बालकांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी जागतिक स्तरावर काम करणाऱ्या युनिसेफने १ जानेवारी या दिवशी जन्माला आलेल्या बालकांसाठी स्वागताचा कार्यक्रम आयोजित करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content