हाजी गफ्फार मलिक यांच्या स्मरणार्थ जिल्हा रुग्णालयास ट्रॉली स्ट्रेचर भेट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हाजी अब्दुल गफ्फार मलिक यांच्या द्वितीय स्मरणार्थ मलिक फाऊंडेशन व जळगाव जिल्हा मनीयार बिरादरी तर्फे दोन अत्याधुनिक ट्रॉली स्ट्रेचर जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे भेट देण्यात आले.

रुग्ण दावाखाण्यात आल्यावर ट्रॉली स्ट्रेचर ची संख्या कमी पडत असल्याची बाब मनीयार बिरादरी चे अध्यक्ष फारुक शेख यांच्या लक्षात येताच हे स्ट्रेचर उपलब्ध करण्यात आले.
मलिक परिवारा तर्फे वहाब मलिक, नदीम मलिक तर मनीयार बिरादरी तर्फे फारुक शेख,सैयद चांद, ताहेर शेख व ईदगाह ट्रस्ट तर्फे अनिस शाह यांनी हे स्ट्रेचर प्रभारी डीन डॉ जितेंद्र घुमरे, रजिस्ट्रार डॉ. विजय गायकवाड, डॉ. दीपक शेजवळ, डॉ. सुरवाडे यांना सुपूर्द केले. कै हाजी गफ्फार मलिक यांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content