Home Cities धरणगाव नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्याआधी सलीमभाईंच्या कबरीचे दर्शन !

नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्याआधी सलीमभाईंच्या कबरीचे दर्शन !

0
65

kabar darshan

धरणगाव प्रतिनिधी । येथील नवनिर्वाचीत लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळण्याआधी आज सकाळी दिवंगत नगराध्यक्ष सलीमभाई पटेल यांच्या कबरीचे दर्शन घेतले.

धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांचा आज रोजी नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा आहे. तत्पूर्वी त्यांनीआज सकाळी दिवंगत सलीम पटेल यांच्या कबरीचे विधीवत दर्शन घेऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी निलेश चौधरी यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी त्याचा सोबत माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, कालू उस्ताद, सद्दाम अली व विनोद रोकडे उपस्थित होते. दरम्यान, कबरीचे दर्शन घेतल्यानंतर निलेश चौधरी आज सकाळी अकरा वाजता नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.


Protected Content

Play sound