Home Cities पारोळा राज्यस्तरीय इंस्पायर स्पर्धेसाठी प्रथमेश भावसारची जिल्ह्यातून निवड

राज्यस्तरीय इंस्पायर स्पर्धेसाठी प्रथमेश भावसारची जिल्ह्यातून निवड

0
117

parola ulhas patil

पारोळा प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन इंस्पायर अवार्ड 2019चे आयोजन करण्यात आले होते. यात येथील करोडपती इंग्लिश मीडियम मधील दहवीचा विद्यार्थी प्रथमेश भावसार याने प्रथम क्रमांक पटकावला असून त्याची राज्यस्तरीय निवड करण्यात आली आहे. गोदावरी फाउंडेशनचे डॉ. उल्हास पाटील जि.प. सभापती पोपटराव भोळे व मान्यवर यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्मुती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या इंस्पायर अवॉर्डमध्ये 203 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यातील जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यातील 20 विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी करण्यात आली. प्रथमेश भावसार यांच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यु.एच.करोडपती, सचिव डॉ.सचिन बडगुजर तसेच संचालिका मंगला करोडपती व सर्व संचालक मंडळ तसेच जळगाव जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, पारोळा पं.स.गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे, विस्तार अधिकारी चंद्रकांत चौधरी, बालाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमांत पाटील, माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य व्ही.जे.बडगुजर, एम.यु. करोडपती व विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत पाटील यांनी अभिनंदन केले. प्रथमेश हा बी.टीव्ही.चे संचालक दीपक भावसार यांचे चिरंजीव आहे.


Protected Content

Play sound