यावल पोलीस निरिक्षकांनी वाहतूक समस्येबाबत नागरिकांशी साधला संवाद

yaval police

यावल, प्रतिनिधी | येथील तालुका पोलीस स्टेशनमध्ये सध्या कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक रविकांत सोनवणे हे काही दिवस सुटीवर गेल्याने त्यांचा पदभार सध्या मुंबई येथील क्राईम ब्रांचमध्ये सेवा दिलेले पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्याकडे आहे. त्यांनी आज (दि.२८) शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी भेटी देवुन नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणुन घेतल्या.

 

येथील पो.स्टे.ला कालच रुजु झालेले पो.नि. धनवडे यांनी आज सकाळीच शहरातील फैजपुर रोड वरील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे व उपप्राचार्य खैरनार यांच्यासह कॉलेजच्या शिक्षकांशी आणि विधार्थी-विद्यार्थीनींशी संवाद साधला. त्यांच्या विविध समस्या व अडचणी समजुन घेतल्या.

त्याचबरोबर शहरातील भुसावळ टी पॉईंटवरील मिनीडोअर आणि रिक्शा चालकांशी संपर्क साधुन वाहन चालकांना वाहकतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे, प्रवाशांशी संवाद साधतांना समन्ययाने आणि प्रेमाच्या भाषेत संभाषण करावे, अपघातसमयी आपल्या सहप्रवाशांना किंवा इतर वाहन धारकांना तातडीने मदत करावी, अशा सुचना दिल्या. त्यांनी आज बसस्थानक परिसराचीही पाहणी केली. गावातील बोरावल गेटपासुन तर बुरूज चौकापर्यंत शहरातील प्रमुख मार्गावरच्या बाजार पेठेतील दुकानासमोर बेशिस्तपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाची दखलही घेतली. यावर आपण तत्काळ सर्व व्यापारी बांधव आणि शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेणार असल्याचेही धनवडे यांनी यावेळी सांगीतले.

Protected Content