गुड शेपर्ड स्कुलचे सुयश : विज्ञान प्रदर्शनात जिह्यात तृतीय

good shefard school

धरणगाव, प्रतिनिधी | गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील मेडिकल अँड इंजिनिअरिंग कॉलेज येथे २६ ते २८ डिसेंबर दरम्यान संपन्न झालेल्या ४५ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा आज समारोप समारंभ झाला. या प्रदर्शनात येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.

 

या तीन दिवशीय प्रदर्शनात माध्यमिक गटात येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल, इयत्ता ९ वी चे विद्यार्थी दीपेश राजेंद्र चव्हाण आणि रोशन किशोर शिंदे यांनी भारतातील भविष्यातील परिवहन व संचार या विषया अंतर्गत ‘भारताची भविष्यकालीन सुरक्षा व्यवस्था’ याचे मॉडेल तयार केले होते. भारतीय सैन्य दलाची व सीमेच्या सुरक्षेचा विचार करणाऱ्या या मॉडेलला आज समारोप व बक्षीस वितरणप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षिका सपना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण सभापती पोपट भोळे, शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील, विज्ञान प्रदर्शनाचे जिल्हा समन्वयक प्रा. शैलेश राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थांनी मिळविलेल्या या यशाबद्दल पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अनिल बाविस्कर, विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे तसेच गुड शेपर्ड स्कुलच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकवर्ग यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Protected Content