अवांतर वाचनासह लिखाणातील सातत्य गरजेचे- अपर्णा देसाई

KCE NEWSA

जळगाव प्रतिनिधी । आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. दर्जेदार लिखाणात सातत्य ठेवल्यास या बदलत्या आव्हानांना सामोरे जात नोकरी व रोजगाराच्या अनेक संधी आज उपलब्ध आहेत, असे विचार (कॉरोस्पॉनडंट) ऑल इंडिया रेडीओ, गुजरात येथे कार्यरत असलेल्या अपर्णा देसाई यांनी केले.

जनसंवाद व पत्रकारिता विभागातर्फे आयोजित “मास मीडियातील करिअरच्या संधी” या कार्यक्रमावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले. पुढे बोलताना त्या म्हटल्या की, प्रत्येक माणूस हा आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी संवादाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतो आहे, मात्र संवादाला तितकीच प्रसिद्धीची ही जोड मिळावी यासाठी सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आकाशवाणी, दूरदर्शन यासारख्या माध्यमांचा वापर वाढत आहे. या क्षेत्रात करिअरच्या असंख्य संधी आज उपलब्ध असून स्वतःला कशात रस आहे हे ओळखून त्यासाठी कसोशीने वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळते.

केंद्र व राज्य शासन प्रचार व प्रसारासाठी आकाशवाणी, दूरदर्शन या माध्यमांचा व्यापक प्रमाणात वापर करत असल्याने या ठिकाणी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित वाचन लिखाण तसेच अवांतर वाचन करणे देखील तितकेच गरजेचे आहे असे त्यांनी मत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्न व शंकांचे ही त्यांनी योग्य ते निरसन केले. यावेळी व्यासपीठावर शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे, जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा. संदीप केदार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रा. संदीप केदार यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रंजना सोनवणे, प्रा. डॉ. के. व्ही. बाविस्कर, प्रा. डॉ. वंदना चौधरी, प्रा. डॉ. सुनिता नेमाडे, प्रा.डॉ. जयश्री पाटील, प्रा. डॉ. स्वाती चव्हाण, प्रा. डॉ. सुनिता नेमाडे , प्रा. केतन चौधरी, प्रा. आर. बन्नापुरे, संगणक – लिपिक मोहन चौधरी तसेच जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे प्रा. प्रशांत सोनवणे, प्रा. केतकी सोनार, प्रा. अभय सोनवणे, संजय जुमनाके यांच्यासह पत्रकारिता विभाग तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content