Home क्राईम हैदराबाद प्रकरण: आरोपींनी आधी नऊ महिलांची हत्या केल्याचा पोलीसांचा दावा !

हैदराबाद प्रकरण: आरोपींनी आधी नऊ महिलांची हत्या केल्याचा पोलीसांचा दावा !


Hyderabad Encounter
 

हैदराबाद वृत्तसंस्था । हैदराबाद प्रकरणातील आरोपींनी याआधी नऊ महिलांची बलात्कार करुन निर्घृण हत्या केल्याचं खळबळजनक माहीती समोर आली आहे. या चार आरोपींपैकी दोन आरोपींनी या आधी नऊ महिलांवर बलात्कार करुन त्यांना जिवंत जाळल्याची कबुली दिली होती, असा दावा हैदराबाद पोलीसांनी केला आहे.

पोलिस कर्नाटकात तळ ठोकून असून 9 गुन्ह्याची सत्यता पडताळून पाहिली जात आहे. दरम्यान, पोलीसांच्या म्हणण्यानुसर हे बलात्कार कर्नाटक-तेलंगणा सीमेवर झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. यासाठी पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पुरावे गोळा करत आहेत. 6 डिसेंबरला पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत हैदराबाद गँगरेप आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपी ठार झाले होते. आरिफ आणि चेन्‍नाकेशवुलु या दोघांनी आणखी काही बलात्कार आणि हत्यांची कबुली दिल्याचा दावा केला जात आहे. तेलंगणाच्या संगारेड्डी, रंगारेड्डी, मेहबूबनगर आणि आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागात हे प्रकार घडल्याची माहिती आहे. यामध्ये शरीरविक्री करणाऱ्या महिला, तृतीयपंथी यांचाही समावेश आहे.

हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊण्टर करण्यात आला. हैदराबाद पोलिसांच्या तावडीतून आरिफ, शिवा, नवीन आणि चिन्नाकेशवुलू हे चारही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते जागीच ठार झाले. मात्र ही कारवाई खरी होती की नियोजनपुर्व होती याची चौकशी सीआयटी मार्फत करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound