जळगाव (प्रतिनिधी) येथील डॉ.अल्तमश हसन यांची महाराष्ट्र मनियार बिरादरीच्या राज्य सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल बागबान विकास फौंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.शरीफ बागवान,सामाजिक कार्यकर्ते अशफाक पिंजारी, हाजी युसूफ शेख,गुलाब अमीर शेख व अशोक बुनकर यांच्या हस्ते गुलाबपुष्प आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. मनियार बिरादरीच्या संघटनेत प्रथमच एक उच्चविद्याविभूषित व्यक्तीला संधी मिळाल्याबद्दल या नियुक्तीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.