Home क्राईम डोंबिवलीत लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

डोंबिवलीत लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

0
106


charmy prasad

मुंबई, वृत्तसंस्था | डोंबिवलीत २२ वर्षीय तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. डोंबिवली ते कोपर स्थानकादरम्यान आज सकाळी ९.०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चार्मी प्रसाद असे या मृत तरुणीचे नाव आहे.

 

आज सकाळी ८.५३ ची लोकल चार्मीने पकडली होती. मात्र प्रचंड गर्दीमुळे आत न जाता आल्याने चार्मी बाहेर लटकून राहिली आणि कोपर स्टेशनजवळ तोल जाऊन ती पडली. याच घटनेत तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. डोंबिवलीच्या गर्दीने आणखी एक बळी घेतला आहे.


Protected Content

Play sound