Home Uncategorized विजेची तार तुटून गोठ्यावर पडली; ९ गायींचा मृत्यू

विजेची तार तुटून गोठ्यावर पडली; ९ गायींचा मृत्यू


संगमनेर तालुक्यातील कनोली येथे विजेची तार तुटून गोठ्यावर पडल्याने ९ गायींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे.

या संदर्भात अधिक असे की, संगमनेर येथील शेतकरी नानासाहेब वर्पे यांनी घराजवळील गोठ्यात गायी बांधल्या होत्या. पण गोठ्याजवळुन गेलेली विजेची मुख्य तार अचानक तुटून पडल्याने ९ गायींचा मृत्यू झाला. यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन दुष्काळात ९ गायींचा मृत्यू झाल्याने वर्पे कुटुंबावर मोठे संकट उभे राहिले आहे. तसेच महावितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष करत हलगर्जीपणा केल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. महावितरणने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound