राष्ट्रवादी आयोजित मोफत नेत्र शिबिराचा २४ महिला रुग्णांना लाभ

चाळीसगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार राजीवदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने महिलांसाठी विशेष असे मोफत रोगनिदान व उपचार शिबिर नुकतेच बापजी रुग्णालय घेण्यात आले होते.

 

या शिबिरात स्त्री रोग ,अस्थीरोग ,त्वचा रोग,हृदय रोग, नेत्ररोग, होमिओपथी, आयुर्वेद तज्ञ अशा अनेक तज्ञ डॉक्टरांनी तपासण्या करून रोगनिदान व त्यावर मोफत औषधे वाटप करण्यात आले होते.११२३ गरजू महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला होता. त्यातील नेत्र तपासणीत २४ गरजू आणि आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या रुग्णांचे डोळ्यांचे ऑपरेशन करणे अत्यंत गरजेचे होते,असे तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले. त्या २४ रुग्णांच्या डोळ्यांच्या ऑपरेशनचा खर्च राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुढाकाराने एका दानशूर व्यक्तीने उचलला असून, एका दिवसाला ५ याप्रमाणे बापजी रुग्णालय चाळीसगाव येथे सर्व २४ ऑपरेशन पूर्ण झाले आहेत.

 

तज्ञ डॉक्टरांकडून मोफत रोगनिदान तपासणी,मोफत औषधे आणि त्याही पुढे जाऊन गरजूचे मोफत ऑपरेशन करण्यात आले. यासाठी सर्व सामान्य जनतेत समाधान व्यक्त होत आहे .या वेळी ऑपरेशन झालेल्या रुग्णांची भेट घेण्यात आली व त्यांची विचारपूस करण्यात आली.यावेळी तालुकाध्यक्षा सोनल साळुंखे,शहराध्यक्षा प्रतिभा पाटील, युवती अध्यक्षा हेमांगी शर्मा,अनिता शर्मा,उज्वला पाटील,योगेश पाटील, राजू मोरे,प्रकाश पाटील, सुजित पाटील,प्रवीण जाधव,गोकुळ पाटील, सौरभ त्रिभुवन, संकेत देशमुख, पिनु सोनवणे, पंजाबराव देशमुख,श्रीकांत राजपूत,स्वप्नील पाटील, विनीत गवळी यांच्यासह डॉ.संदीप देशमुख आणि डॉ.संदीप साहू हे देखील उपस्थित होते.

Add Comment

Protected Content