
जळगाव, प्रतिनिधी । शासकीय आयटीआय, मुलांचे वसतीगृहात 18 डिसेंबर, 2019 रोजी आयटीआय तसेच किमान कौशल्य उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवार भरती मेळावा आयोजित केला आहे.

या मेळाव्यास स्थानिक मोठ्या कंपन्या, औरंगाबाद तसेच रांजणगाव (पुणे) येथील कंपन्या उमेदवार निवड चाचणीसाठी येणार आहेत.
तरी आयटीआय तसेच किमान कौशल्य उत्तीर्ण उमेदवारांनी स्वखर्चाने शासकीय आयटीआय, मुलांचे वसतीगृह, जळगाव येथे वेळेवर उपस्थित राहून भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन अंशकालीन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (आयटीआय मुलांचे) यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


