Home राजकीय सत्तेसाठी महाराष्ट्रात केलेला भाजपचा खोटेपणा उघड करू : सोनिया गांधी

सत्तेसाठी महाराष्ट्रात केलेला भाजपचा खोटेपणा उघड करू : सोनिया गांधी


sonia Gandhi 1513392988
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर आम्ही सगळे मिळून भाजपचा खोटेपणा उघड करू. भाजपने सत्तेसाठी महाराष्ट्रात केलेले कृत्य लज्जास्पद होते, अशा शब्दात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक आज, गुरुवारी झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह विविध मुद्द्यांवरून भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली. शिवसेना, भाजप आणि काँग्रेसची सत्ता येऊ नये यासाठी भाजपने पुरेपूर प्रयत्न केला होता. एवढेच नव्हे, तर राज्यपाल भगत सिंह कोश्यारींनी देखील तसेच केले. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या निर्देशांचे पालन करत होते. राज्यपालांनी 23 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांना शपथ देण्यासाठी भल्या पहाटे केलेला खटाटोप योग्य ठरवला जाऊ शकत नाही असेही सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.


Protected Content

Play sound