मुंबई प्रतिनिधी । संजय राऊत यांनी आपल्या बोलण्याने शिवसेनेचे खूप नुकसान केले असून त्यांनी आता तरी बोलणे थांबवावे असा खोचक सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी दिला.
आजच्या वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमिवर, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी भाष्य केले. यात त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, राऊतांच्या बोलण्याने शिवसेनेचे खूप नुकसान झाले असून आता तरी त्यांनी बोलणे थांबवावे असा सल्ला त्यांनी दिला. दरम्यान, त्यांनी शिवसेनेलाही लक्ष्य केले. ते म्हणाले की, आम्ही आजवर मातोश्रीचा सन्मान केला. मात्र आज उध्दव ठाकरे यांना सिल्व्हर ओकवर जावे लागते. एवढेच नव्हे तर बाळासाहेब थोरात यांना भेटण्यासाठी हॉटेलातदेखील जावे लागते याबाबत खंत व्यक्त करून शिवसेनेने जनादेशाचा अपमान केल्याची जोरदार टीकादेखील केली.