Home राज्य ‘अग्रलेखांचा बादशहा’ काळाच्या पडद्याआड; नीळकंठ खाडिलकरांचे निधन

‘अग्रलेखांचा बादशहा’ काळाच्या पडद्याआड; नीळकंठ खाडिलकरांचे निधन

0
31

nilkanth khadilkar

मुंबई प्रतिनिधी । ‘अग्रलेखांचा बादशहा’ म्हणून ख्यात असणारे दैनिक नवाकाळचे माजी संपादक निळकंठ खाडीलकर यांचे आज पहाटे निधन झाले.

ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडीलकर (वय ८५) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते तब्बल २७ वर्षे दैनिक नवाकाळचे संपादक होते. त्यांचे अग्रलेख हे अतिशय वाचनीय असून याचमुळे त्यांचा अग्रलेखांचा बादशहा ही उपाधी मिळाली होती. आपल्या लिखाणातून त्यांनी नेहमीच गरीब आणि शोषितांची बाजू घेतली होती. त्यांच्या निधनाने मराठी वृत्तसृष्टीतील एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेल्याची संवेदना व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound