सरकार स्थापनेबाबत ठाकरे व पवारांमध्ये चर्चा

sharad pawar and uddhav thackeray

मुंबई प्रतिनिधी । सत्ता स्थापनेबाबत मध्यरात्री उध्दव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी मध्यरात्री सुमारे एक तास चर्चा केली आहे.

गुरूवारी दिवसभर राजकीय घडामोडी विलक्षण वेगाने घडल्या. यानंतर मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास उध्दव ठाकरे हे शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले. याप्रसंगी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हेदेखील होते. यानंतर त्यांनी सुमारे एक तासांपर्यंत पवार यांच्यासोबत चर्चा केली. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. यातील चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी सत्ता स्थापनेबाबत यात मंथन करण्यात आल्याचे कळते. सिल्व्हर ओक येथून बाहेर पडल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी आपण आता काहीही बोलणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, शुक्रवारी महाविकास आघाडीबाबत महत्वाच्या घडामोडी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content