Home ट्रेंडींग रानू मंडलचा ट्रोल झालेला फोटो फेक; समोर आली खरी इमेज !

रानू मंडलचा ट्रोल झालेला फोटो फेक; समोर आली खरी इमेज !

0
97

ranu mandal new photo

मुंबई प्रतिनिधी । भडक मेकअपमुळे ट्रोल झालेल्या रानू मंडलचा नवीन फोटो समोर आल्याने या प्रकरणाला टर्न मिळाला असून यावरून सोशल मीडियात पुन्हा एकदा जोरदार चर्वण सुरू झाले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून गायिका बनून प्रसिध्दीच्या शिखरावर विराजमान झालेल्या रानू मंडल या गायिकेचा अत्यंत भडक आणि विचीत्र मेकअप असणारा फोटो अलीकडेच प्रसिध्द झाल्याने धमाल उडाली होती. सोशल मीडियात यावरून तिची प्रचंड खिल्ली उडविण्यात आली. यावरील जोक्स, मिम्स आणि व्हिडीओजनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. अल्पावधीत मिळालेले यश तिच्या डोक्यात गेल्याचा यातून बहुतेकांनी आरोप केला होता. मात्र आता या प्रकरणाला टर्न मिळाला असून सोशल मीडियात व्हायरल झालेला फोटो हा फेक असल्याचा दावा रानूचा मेकअप असणार्‍या संध्या यांनी केला आहे.

मेकअप आर्टीस्ट संध्या यांनी इन्स्टाग्रामवर रानू मंडल यांचा मेकअप करतांना व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे. यात मेकअप केल्यानंतर रानू नेमक्या कशा दिसतात हे दाखविण्यात आले आहे. यासोबत त्यांनी सोशल मीडियात रानू मंडल यांची खिल्ली उडविण्यात येणारा व्हिडीओ हा खोटा असून मूळ प्रतिमेत छेडछाड करण्यात आल्याचा दावा केला आहे. यासोबत तिने रानूची खिल्ली उडवणार्‍यांवर टीकादेखील केली आहे.

खाली पहा मेकअप आर्टीस्ट संध्याची इन्स्टाग्राम पोस्ट.

खालील पोस्टमध्ये संध्या यांनी रानू मंडलचा मेकअप करतांनाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/tv/B4-T3k_gwIY/?utm_source=ig_web_copy_link


Protected Content

Play sound