Home धर्म-समाज श्री राम प्रतिष्ठानतर्फे राणी लक्ष्मीबाई यांना अनोखी वंदना

श्री राम प्रतिष्ठानतर्फे राणी लक्ष्मीबाई यांना अनोखी वंदना

0
107

parola news

पारोळा, प्रतिनिधी | झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या येथील अर्धाकृती पुतळ्याच्या परिसरात त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील श्री राम प्रतिष्ठानच्या तरुणांनी साफसफाई करून त्यांना अनोखी वंदना दिली.

 

न.पा.प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या पुतळ्याच्या आजूबाजूला अतिक्रमण वाढले असून हा पुतळा गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षितच राहिला आहे. यंदा मात्र श्री राम प्रतिष्ठानच्या तरुणांनी पुतळ्याच्या परिसरात स्वच्छता करून राणीच्या आजोळच्या गावात अनोख्या पद्धतीने त्यांची जयंती साजरी केली आहे.
गावातील तरुणपिढी सतत मोबाईल आणि राजकारण यात वेळ घालवत असताना या तरुणांनी त्यांच्यासमोर नवा आदर्श ठेवला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल बागड, उपाध्यक्ष अमोल भामरे, सदस्य गणेश क्षत्रिय, निलेश जगदाळे, सुहास राजपूत, राहुल महाजन, सोनू कुमार यांनी यात सहभाग घेतला होता. त्यामुळे शहरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. यापुढेही अशाचप्रकारे समाज उपयोगी कार्य करण्याचा मनोदय प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound