Home राजकीय राज्यात भाजपचेच सरकार येणार : फडणवीस

राज्यात भाजपचेच सरकार येणार : फडणवीस

mumbai cm devendra fadanvis bjp
mumbai cm devendra fadanvis bjp

mumbai cm devendra fadanvis bjp
 

मुंबई (वृत्तसंस्था) सध्याची राजकीय परिस्थिती बघता राज्यात भाजपशिवाय कुणाचेही सरकार येऊ शकत नाही, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

 

दादरच्या भाजप कार्यालयात भाजपच्या आणि भाजप समर्थक आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य करतानाच शिवसेनेवरही दोषारोप केले. भाजपच्या सहभागामुळेच मित्रपक्षांना जास्त जागा जिंकता आल्या. भाजपचे नेते शिवसेनेच्या अनेक मतदारसंघात प्रचारासाठी गेले. या उलट शिवसेनेचा एकही नेता भाजप उमेदवारांच्या मतदारसंघात प्रचारासाठी आला नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजप वगळता राज्यात कोणतेही सरकार स्थापन होऊ शकत नाही, अशीच सध्याची राजकीय परिस्थिती आहे. योग्यवेळी पक्ष निर्णय घेईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्याचे स्पष्ट आहे.


Protected Content

Play sound