जळगाव प्रतिनिधी । ऑनलाईन फुड डिलीव्हरीतील अग्रगण्य कंपनी असणारी झोमॅटो लवकरच जळगावात येत असून यामुळे या क्षेत्राला गती मिळणार आहे.
फेब्रुवारीच्या मध्यावर प्रारंभ
जळगावात सध्या ऑनलाईन फुड डिलीव्हरीसाठी बॅग ऑन व्हिल्स, फुडीज आदी पर्याय उपलब्ध आहेत. यांच्या मदतीने आपण शहरातील निवडक हॉटेल्समधील खाद्यपदार्थ घरपोच मागवू शकतो. अद्याप शहरात ही संकल्पना तशी बाल्यावस्थेत आहे. आता मात्र ऑनलाईन फुड डिलीव्हरीमधील जगविख्यात कंपनी म्हणून ख्यात असणारी झोमॅटो जळगावात पदार्पण करणार आहे. फेब्रुवारीच्या मध्यावर झोमॅटो जळगावात आपला कारभार सुरू करणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील प्रतापनगर आणि औद्योगिक वसाहत परिसरात याला लाँच करण्यात येणार असून काही दिवसांमध्येच पूर्ण शहर कव्हर करण्यात येणार आहे.
घरपोच सेवा
झोमॅटोची सेवा ही अतिशय युजर फ्रेंडली आहे. यात कुणीही युजर कंपनीचे अॅप इन्स्टॉल करून यावरून (या अॅपशी संलग्न असणार्या) आपल्याला हव्या असणार्या हॉटेलमधून कोणताही खाद्यपदार्थ घरपोच मागवू शकतो. या माध्यमातून अतिशय जलद गतीने आपल्याला घरपोच खाद्य पदार्थ मागविता येतात. यासाठी अल्प आकारणी करण्यात येते. यामुळे ही सेवा सर्वत्र लोकप्रिय झालेली आहे. अर्थात, झोमॅटोचे स्वत:चे हॉटेल्स नसून ही जळगाव शहरातील विविध हॉटेल्सशी करार करून ग्राहकाला त्याच्या घरी यातील हवे ते खाद्य पदार्थ पोहचवणार आहेत. कंपनीने यासाठी संकेतस्थळासह स्मार्टफोन अॅपवरून ऑर्डरची सुविधा प्रदान केली आहे.
स्पर्धेत रंगत
जळगाव शहरात वर नमूद केल्यानुसार सध्या ऑनलाईन फुड डिलीव्हरीसाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. यात आता झोमॅटोच्या रूपाने मोठी कंपनी एंट्री करत आहे. यामुळे या क्षेत्रातील स्पर्धा चुरशीची होणार आहे. यासोबत स्मार्टफोनवरून खाद्य पदार्थांची ऑर्डर देण्याच्या व्यवसायाला गती मिळणार आहे. जळगावसोबत झोमॅटोची सेवा धुळ्यातही सुरू होत आहे. अलीकडेच या कंपनीने नगर, सोलापूर आदी शहरांमध्ये आपल्या सेवेचा विस्तार केला आहे.
व्यवसायाला गती
झोमॅटो कंपनी जळगाव शहरात आपला व्यवसाय सुरू करतांना डिलीव्ही बॉईजची भरती करत आहे. यासाठी दुचाकी असणारा कुणीही तरूण अॅप्लीकेशन करू शकतो. या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे याच्या माध्यमातून ऑनलाईन फुड ऑर्डरच्या व्यवसायाला गती मिळणार आहे.
very nice…..for jalgaon
Job
Very Nice …for jalgaon