Home क्रीडा मुंबईच्या संघात पृथ्वी शॉचे पुनरागमन

मुंबईच्या संघात पृथ्वी शॉचे पुनरागमन

0
100


Pruthvi Shaw

 

मुंबई वृत्तसंस्था । भारतीय संघाचा युवा खेळाडू पृथ्वी शॉ पुन्हा मुंबई क्रिकेट संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. पृथ्वी शॉवर अंमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी बंदी घालण्यात आली होती. १९ वर्षीय पृथ्वीच्या शिक्षेचा कार्यकाळ १५ नोव्हेंबर रोजी संपणार आहे.

मुंबईने फक्त पहिल्या तीन सामन्यांसाठीच संघ जाहीर केला आहे. त्यामुळे भारत-बांगलादेश मालिका संपल्यानंतर आम्ही काही प्रमुख खेळाडूंची मुंबईच्या संघात निवड करणार आहेत. जसे पृथ्वीच्या शिक्षेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याला सामन्यांसाठी संघात सहभागी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असे मुंबई संघाच्या निवड समितीचे प्रमुख मिलिंद रेगे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि शिवम दुबे हे मुंबईकर खेळाडू भारत-बांगलादेश मालिकेत खेळत असले तरी, ती मालिका संपल्यानंतर त्यांचाही मुंबईच्या संघात समावेश करण्यात येईल, असेही रेगे यांनी यावेळी सांगितले.


Protected Content

Play sound