मुंबई प्रतिनिधी । जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला कौल दिला असून त्यांनी लवकरात लवकर सरकार बनवावे…आम्ही विरोधात बसण्यासाठी तयार असल्याचे प्रतिपादन शरद पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील सत्ता स्थापनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना गेली २५ वर्षे एकत्र राहिलेले पक्ष असून त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि दोन्ही पक्षांनी मिळून सरकार बनवावे. राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध पक्षात बसण्याचाच निर्णय लोकांनी दिला आहे. आम्ही आणि काँग्रेस १०० या आकड्याच्या पुढे जात नाही, त्या मुळे आमचे सरकार कसे बनेल असा प्रश्न उपस्थित करत आपल्याला मुख्यमंत्री बनण्याची जराही रस नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्य सरकारकडून शेतकर्यांना मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे पवार म्हणाले. विमा मिळत नसल्यास केंद्र सरकारने विमा कंपन्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्या आणि शेतकर्यांना केंद्र सरकारे मदत करावी असी मागणीही. या बरोबरच सरकारने शेतकर्यांना पेरणीसाठी तातडीने कर्ज द्यावे, अशी मागणी शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत केली.