धरणगाव, प्रतिनिधी | जळगांव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मतदार बंधू भगिनींनी गुलाबराव पाटील यांना भरघोस मतांनी विजय मिळवून दिल्याबद्दल उद्या (दि.१) रोजी दुपारी ४.०० वाजता मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी येथे एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी नगर परिषदेपासून गुलाबराव पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सभास्थळी विजयाबद्दल त्यांचे अभीष्टचिंतन केले जाणार आहे. यावेळी शहरातील व मतदार संघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष महाजन, शहर प्रमुख गजानन पाटील व युवा सेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांनी केले आहे.