Home Agri Trends नुकसानीचे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करा – ना. जावळे

नुकसानीचे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करा – ना. जावळे


4haribhau jawle

फैजपूर प्रतिनिधी । संततधार पावसामुळे यावल व रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान झाले आहे. त्वरीत नुकसानीचे पंचनामे करून ओला दुष्काळाचे प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना ना.हरीभाऊ जावळे यांनी प्रांताधिकाऱ्यांना केले आहे.

काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. पंचनाम्याना सुरवात झाली आहे. रब्बीचा हंगाम घेण्यासाठी पंचनामे तात्काळ होणे गरजेचे आहे त्या दृष्टीने ते तात्काळ पूर्ण करावे, आणि त्या सोबतच ओल्या दुष्काळाचे प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना ना.हरीभाऊ जावळे यांनी प्रांताधिकारी अजित थोरबोले यांना दिल्या आहेत.

शेतकऱ्यांचा विमा असेल किवा नसेल सरसकट सर्वाना ओल्या दुष्काळाचा लाभ मिळावा, यासाठी प्रस्ताव सादर झाल्यावर मुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांना ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी कृषी, शिक्षण व संशोधन परिषद उपाध्यक्ष ना.हरीभाऊ जावळे करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


Protected Content

Play sound