Home Cities यावल भालोद येथे ना. हरीभाऊ जावळेंनी बजावला मतदानाचा हक्क (व्हिडीओ)

भालोद येथे ना. हरीभाऊ जावळेंनी बजावला मतदानाचा हक्क (व्हिडीओ)


haribhau jawale voting

फैजपुर प्रतिनिधी । रावेर विधानसभा मतदार संघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार ना. हरीभाऊ जावळे यांनी आज सकाळी भालोद येथील आपला मतदानाचा हक्क बजावला.

ना. जावळे यांनी फैजपूर येथील म्युनिसीपल हायस्कूल येथे मतदारांच्या भेटी घेत मतदान केंद्रावर होणाऱ्या अडचणी मतदारांकडून जाणून घेतल्या तसेच वयोवृद्धांना व्हील चेअरची व्यवस्था नसल्याने त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांशी बोलून त्याठिकाणी व्हीलचेअरची सोय वयोवृद्ध व दिव्यांग बांधवांसाठी उपलब्ध करून दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा दूध संघ संचालक हेमराज चौधरी, माजी जि.प. सदस्य भरत महाजन, माजी संचालक नितीन राणे यांच्यासह शिवसेनेचे आप्पा चौधरी, राजू काठोके, भाजप शहराध्यक्ष संजय रल यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound