पुण्यात ‘मतदार मदत केंद्र’ सुरु

pune 2

 

पुणे प्रतिनिधी । मतदानाच्या दिवशी मतदारांना काही अडचणी आल्यास त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने “मतदार मदत केंद्र” (डिस्ट्रिक्ट कॉल सेंटर) नुकतेच सुरू करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी नवल राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, अजित रेळेकर, सुरेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, उपजिल्हाधिकारी वर्षा पवार, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते. या मदत केंद्रामध्ये १५ दूरध्वनी संच जोडण्यात आले आहे. २१ ऑक्टोबरला सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत जिल्ह्यातील मतदारांनी मतदान करण्याचे आवाहनही या केंद्रातील दूरध्वनीवरून मतदारांना करण्यात येणार आहे.

Protected Content