लोखंडी सळईचा डंपर उलटल्याने ८ जणांचा मृत्यू

 

बुलढाणा : वृत्तसंस्था ।  जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील तडेगावाजवळ समृद्धी महामार्गाच्या कामाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झालाय तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

सिंदखेडराजा तालुक्यातील तडेगावमध्ये लोखंडी सळई घेऊन जात असलेला डंपरवरुन १६ मजूर प्रवास करत होते. समोरुन येणाऱ्या बसला रस्ता देण्यासाठी डंपरचालकाने तो बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता तो पलटला आणि मोठा अपघात घडला.

 

अरुंद रस्त्यावरुन समोर येणाऱ्या बसला जागा करुन देण्याच्या प्रयत्नात डंपर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की डंपरमधील सळई मजुरांच्या अंगात आणि पाठीमध्ये घुसल्या आहेत. त्यामुळेच घटना स्थळीच आठ मजूरांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात १२ मजूर जखमी झाले असून त्यातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

 

Protected Content