अमळनेर, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आ.शिरीष चौधरी यांच्या प्रचारार्थ आज (दि.१५) सायंकाळी ८.०० वाजता शहरातील कसाली मोहल्ला भागात भाजपाचे प्रदेश प्रवक्ते व अल्पसंख्यक सेलचे प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेला शहर व परिसरातील सर्व नागरिकांनी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीतर्फे करण्यात आले आहे.